Pune: पुणे महानगरपालिकेचे हद्दीत समाविष्ट 34गावे आणि जुने पुणे यातील शास्ती कर माफीच्या निर्णयाचे माजी नगरसेवकांकडून स्वागत 

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेचे हद्दीत समाविष्ट 34 गावे आणि जुने पुणे यातील शास्ती (Pune)कर माफीच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे माजी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, (Pune)उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्याचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, नागरी हक्क समितीचे अध्यक्ष सुधीर काका कुलकर्णी यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे याचे आम्ही स्वागत करतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये यापूर्वी हा निर्णय घेतला होता.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असणाऱ्या गावातील नागरिकांना महानगरपालिकेने घेतलेल्या चुकीच्या धोरणाच्या निर्णयामुळे चुकीच्या पद्धतीने कर आकारणी झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

Pune: यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वांगीण विकासामुळे आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा- डॉ. राजा दीक्षित

शास्ती कर माफ करत असताना तो निवासी रहिवाशांना 100% माफ करून त्यांची महानगरपालिकेने केलेली कर आकारणी दुरुस्त करणे आवश्यक आहे, नाहीतर हा प्रश्न वारंवार उपस्थित होत राहील.
व्यावसायिक कमर्शियल वापरासाठी असणाऱ्या मिळकतींवरील शास्ती कर हा50% ठेवावा आणि त्यांची देखील पुन्हा कर आकारणी करावी.
गुंठेवारी बाबत कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामाना जो न्याय देणार आहात, तोच दर महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना देखील मिळाला पाहिजे, ही आमची आपल्याकडे आग्रहाची मागणी असल्याचे या नागरसेवकांनी स्पष्ट केले.
पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचेही या नगरसेवकांनी म्हटले आहे. विशेषतः पालकमंत्री अजित पवार आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, संजय जगताप आणि यांचेही आभार यांनी या विषयांमध्ये लक्ष घालून पुढाकार घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.