Pimpri: क्रियाकलाप DIPEX – 2024 मध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या  विध्यार्थाचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विदयार्थी परिषद  आणि सृजन ट्रस्ट (Pimpri)यांच्या प्रमुख क्रियाकलाप DIPEX – 2024 मध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या  विध्यार्थाचे घवघवीत यश मिळवले आहे.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील (महाराष्ट्र उच्च व तंत्र शिक्षणमंत्री), (Pimpri) आशिष उत्तरवार,  मधुसूदन बी. अग्रवाल,  विनोद मोहितकर,  यज्ञवल्कय शुक्ल प्रा. श्रीकांत दुगडीकर,  कनक कवडीवाले उपस्थित होते.
या प्रतिष्ठित राज्यस्तरीय प्रदर्शन सहस्पर्धा मध्ये विविध अभियांत्रिकीच्या आंतरशाखीय थिम वर प्रकल्पांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. 7 ते 10 मार्च दरम्यान नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोवा येथील 1200 प्रकल्पांमधून 288 प्रकल्प निवडण्यात आले. त्यात पिंपरी चिंचवड पॉलीटेकनिकच्या माहिती आणि तंत्रज्ञान या विभागातील तृतीय वर्षाला शिकत असलेल्या विध्यार्थाना त्यांच्या “VPN Sneak ” या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

Thergaon : महापालिका उभारणार 60 खाटांचे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय 

यशस्वी विध्यार्थाना  ए. राजराजन, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि सध्या संचालक धवन स्पेस सेंटर “SHAR” श्रीहरिकोटा यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख 10 हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या विद्यार्थ्यांचे पिंपरी चिंचवड एज्युकशन ट्रस्टचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर लांडगे उपाध्यक्ष  पद्मा भोसले, सचिव,  विठ्ठल काळभोर, खजिनदार, . शांताराम गराडे, विश्वस्त  हर्षवर्धन पाटील, उद्‌योजक  नरेंद्र लांडगे . अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि प्राचार्य डॉ. व्ही एस बायकोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.