YCMH : कर्मचारी महासंघाचे वायसीएममधील मेडिकल पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने (YCMH)पालिका कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय आणि शहरातील गोरगरीब नागरीकांना सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीए) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे “महासंघ मेडिकल्स” हे औषधांचे दुकान आज बुधवारपासून पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

 

Pune: सिंहगड रोड जवळ अफूची शेती, 14 किलो अफूची बोंडे जप्त

ही सेवा ना नफा-ना तोटा या तत्वावर यापूर्वी 8 फेब्रुवारी 2015 पासून सुरु करणेत आली होती. परंतु न्यायालयीन प्रक्रीयेमध्ये मागील काळात सेवा खंडीत होती. आता महासंघ मेडिकलची सेवा सर्वांसाठी अविरतपणे सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी दिली.

झिंजुर्डे यांनी सांगितले की, सन 2019 रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणुक झाली. सदर निवडणुकीमध्ये अंबर चिंचवडे यांच्यासह त्यांचा संपुर्ण पॅनल विजयी झाला. या मेडिकल स्टोअरचा ताबा त्यांच्याकडे कामगार आयुक्त पुणे यांचेकडील नियुक्त करणेत आलेल्याप्रशासकामार्फत सुपूर्द करण्यात आला.

 

25 फेब्रुवारी 2022 रोजी पुन्हा पिंपरी- चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक झाली.  त्यात आमचा पॅनल विजयी झाला. वास्तविक निवडणूक झाल्यानंतर पुर्वीच्या पदाधिकाऱ्यांने नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांकडे कर्मचारी महासंघाच्या सर्व स्थावर मालमत्तांचा ताबा देणे गरजेचे होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.