Pune: बारामती लोकसभा मतदारसंघात लढणार म्हणजे लढणारच – विजय शिवतारे 

एमपीसी न्यूज – आगामी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक (Pune)लढविणार म्हणजे लढविणारच असल्याचे शिवसेना नेते (शिंदे गट) विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. मोदींना माझा विरोध नाही.
मात्र, अजितदादांना धडा शिकवायचा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत (Pune)सांगायचे झाले तर हे कालचक्र आहे. नमो मंच विचार खाली निवडणूक लढवणार, असल्याचेही शिवतारे म्हणाले.
शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांवर घणाघाती टीका केली. अजित पवार हे उर्मट आहेत, असं बारामतीकरांचं मत असून ते अजित पवारांना मत देण्यापेक्षा सुप्रिया सुळेंना मत देतील, असंही शिवतारे म्हणाले. तसेच, अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली, असंही ते म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघात आता तिहेरी लढत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पवारांचे टेन्शन वाढले आहे.
2019 च्या निवडणुकीत मी त्यांच्या मुलाविरोधात प्रचार केला होता. ते राजकीय होते मी वैयक्तिक पातळीवर तो केला नव्हता. पण अजित पवारांनी सभ्यतेची सर्वात नीच पातळी गाठली. जेव्हा माझी प्रकृती बरी नव्हती तेव्हा रुग्णवाहिकेतून प्रचार केला.

तेव्हा अजित पवार म्हणाले, मरायला लागले आहात तर कशाला निवडणूक लढवता. खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेताय असं म्हणाले होते. तू कसा निवडून येतो हे मी बघतो, असंही ते म्हणाले. अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. त्यांना मी माफ केलं.

Pune: पुणे महापालिकेला श्री तांबडी जोगेश्वरीच्या ‘ग्रामदेवता पुरस्कार’ 

तरी त्यांची गुर्मी तशीच होती. जेव्हा मी बारामती फिरलो तेव्हा मला असं दिसून आलं की अजित पवार उर्मट आहेत म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतं देऊ, असं लोकांचं मत झालं आहे. लोकांचं असं झालंय की एका बाजुला लांगडा, एका बाजुला वाघ, कुठल्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच.
मग ते मतदान कसं करणार. 686000 मतदार हे पवारांच्या समर्थनात आहेत. तर 550000पवार विरोधात आहेत. त्यांना ना सुप्रिया सुळेंना मत द्यायचं आहे ना सुनेत्रा पवारांना. आवडत्या उमेदवाराला मतदान करण्याची संधीच मिळाली नाही, तर तो लोकशाहीचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेचा घात होतोय असं लक्षात आलं, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.