Pune: मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभेचे भाजपा उमेदवार 

एमपीसी न्यूज – माजी महापौर मुरलीधर किसन मोहोळ यांना आज पुणे लोकसभेची (Pune)भाजपच्या दुसऱ्या यादीत संधी देण्यात आली आहे. मोहोळ हे पहिल्यांदाच पुणे लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. भाजपने मोहोळ यांना पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर पदाची संधी दिली होती. 

 

भाजपतर्फे राज्यसभेचे माजी खासदार संजय नाना काकडे, माजी आमदार जगदीश मुळीक, (Pune)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर यांचे नावे चर्चेत होती. मात्र, या सर्वात आघाडीवर मोहोळ यांचे नाव चर्चेत होते.

 

Pune: महावितरणच्या पुण्यातील आणखी दोन उपकेंद्रांना ‘आयएसओ’चे मानांकन

 

त्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी प्रचाराला सुरुवात केला. अखेर भाजपने त्यांना संधी दिली. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर करुन विरोधी पक्षांना धक्का दिला आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात चांगले काम केले होते. त्याची वरिष्ठ पातळीवर दाखल घेण्यात आली होती. आगामी निवडणुकीत मोहोळ यांना मोदी लाटेचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. 2014 पासून पुणे लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकविला जात आहे. 2024 मध्येही मोदी लाट कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.