Pune : पुणे शहरातील जुने झालेले खाजगी वाडे झोपडपट्टी सदृश्य दर्शवून बोगस SRA योजना करण्याचा प्रयत्न

माजी नगरसेवकांचा आरोप

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील जुने झालेले खाजगी  वाडे झोपडपट्टी सदृश्य दर्शवून बोगस SRA योजना करण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले यांना यासंबंधीचे आज (दि. 9 एप्रिल) रोजी  निवेदन देण्यात आले असून सोबतच  विकास आराखडा (२००7-27) सोबत नकाशा जोडला आहे.

 

लक्ष्मी रोड सिटी पोस्टाजवळील बुधवार पेठ घर क्रमांक 276 अ, 277 ब,279,28०,281,282,853  या ठिकाणी पीएमपीएमल आणि पार्किंग आरक्षित असल्याचे माजी नगरसेवक उज्जवल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी म्हटले आहे.

 

 याबाबतची सविस्तर बातमी अशी आहे की, 277(अ) (ब) मुजावर वाडा 1०,०००  चौरस फुटाचा असून काही भाग पडला असून त्यामधील काही भाडेकरू बाहेर राहायला गेले आहे तर वीस लोक तिथेच वास्तव्यास आहेत. 279 बुधवार पेठ हा वाडा वीस वर्षांपूर्वी मनपाने ताब्यात घेतला असून त्या ठिकाणी आरोग्य विभागाची कोठी आहे. तेथील भाडेकरूंचे पुनर्वसन दत्तवाडी येथे केले आहे.
28० ठकार वाडा हा जमीनदोस्त झालेला  असून तेथे आठ-दहा भाडेकरू बाहेर राहतात. 281 जोशी वाडा राजकुमार अग्रवाल यांच्या मालकीचा आहे. 282 बुधवार पेठ राजकुमार अग्रवाल बन्सीलाल यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी तीन मजली पक्की इमारत आहे.  853 बुधवार पेठ हा वाडा पिंगळे, ढेरे, फिरोजभाई हे दुकानदार व दोन भाडेकरू आहेत.  ही इमारत मोडकळीस आली असून येथे पार्किंगचे आरक्षण आहे.

तसेच, 854 बुधवार पेठ या वाड्यात वाडेकर बंधू, गीता विहार, पॉप्युलर वॉच, पूर्ण पोषाख, हा वाडा लक्ष्मी रोड फेसिंग असून पार्किंगचे आरक्षण आहे.या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून अभिप्राय घेऊन हे खाजगी वाडे झोपडपट्टी सदृश्य दर्शवून येथे एस आर ए योजना करण्याचा काही SRA विकसक व SRA मधील अधिकारी तसेच पुणे महानगरपालिकेतील काही अधिकारी यांचा संयुक्त प्रयत्न चालू आहे.

 

आधीचे पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी वरील सर्व  खाजगी वाडे एस आर ए करण्यास स्थगिती दिली होती. त्यानंतर त्यांनी  एक समिती नेमली होती  व    त्या समितीच्या समोर एसआरए ने अहवाल सादर केला होता पण त्या अहवालावर समितीने निर्णय करायचा आहे हे चालू असतानाच हा  नवीन प्रस्ताव करण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे म्हणून आपल्या निदर्शनास आणले  आहे आणि  याबाबत चर्चेसाठी आपण वेळ द्यावा, असे निवेदनात माजी नगरसेवक उज्जवल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी म्हटले आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे, नगर अभियंता पुणे मनपा, महेश पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य, युवराज देशमुख, मुख्य अभियंता तथा समिती सदस्य दिनेश गिरोला, कार्यकारी अभियंता तथा समिती सदस्य यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.