Chinchwad : ‘दिलीप सोनिगरा ज्वेलर्स’च्या नव्या दालनाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चिंचवडमध्ये उद्घाटन

आजपर्यंत ग्राहकांनी दाखवलेला दृढ विश्वास आणि ग्राहकांप्रती असणारी नम्र सेवेची अतूट बांधिलकी जपून सुरु केली 8 वी शाखा

एमपीसी न्यूज : पिंपरी -चिंचवड शहरात गेली  55 वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या (DSJ) नूतन वास्तूचे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले.

चिंचवड येथील (जनता बँकेच्या खाली) दालनाचे उद्घाटन दिलीप सोनिगरा यांच्या मातोश्री श्रीमती मोहिनीबेन पनराजजी सोनिगरा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सचे संचालक दिलीप सोनिगरा, जितेंद्र सोनिगरा, प्रवीण सोनिगरा, अरविंद सोनिगरा, प्रवीण सोनिगरा, अरविंद सोनिगरा, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, सुरेश भोईर, जयश्री गावडे, नाना काटे असे राजकीय,सामाजिक, व्यापार, बांधकाम व्यावसायिक सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढी पाडवा असल्याने सोने खरेदी साठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

आपल्या प्रिय ग्राहकांसोबत भव्य उद्घाटनाचा आनंद साजरा करताना दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या करणावळीवर सरसकट 25% सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या  करणावळीवर 100% सूट अशा अन्य ऑफरचीही घोषणा यावेळी केली. ह्या विशेष ऑफर्स 9 एप्रिल ते 10 मे 2024 पर्यंतच वैध आहेत. DSJ’ आज, दृढ विश्वास आणि अथक समर्पणाने चिंचवडगांव, हिंजवडी, चाकण, रहाटणी,तळेगांव इत्यादी आठ परिसरांमध्ये आपल्या शाखांची उभारणी केली आहे.

वेडींग ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सिल्वर कलेक्शनपासून ते अति उच्च डायमंड ज्वेलरी कलेक्शन पर्यंत DSJ आपल्या ग्राहकांना विविध आणि सुंदर दागिने उपलब्ध केले आहेत, अशी माहिती संचालक दिलीप सोनिगरा यांनी दिली.

1969 मध्ये समृद्ध उद्दिष्टे समोर ठेवून स्थापन झालेल्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये सोने -चांदी दागिने विक्रीची सेवा देणारे छोटे दुकान म्हणून आपला प्रवास सुरू केला आणि अल्पावधीतच दागिन्यांची उत्कृष्ट निवड, सुंदरता आणि ग्राहकांप्रती असणारी नम्र सेवेची अतूट बांधिलकी यामुळे ‘DSJ’ ने यशाच्या नवीन उंचीवर विस्तार करण्यास सुरवात केली.

प्रत्येक पिढीतल्या स्त्रीने आपले सोने-चांदी, हिरे आणि प्लॅटिनम अलंकारांचे स्वप्न पूर्ण करण्याची आकांक्षा मनाशी बाळगलेली असते आणि म्हणून प्रत्येक पिढीचे हे स्वप्न समजून आपल्या अलंकारांनी ते प्रत्येक स्वप्न पूर्ण करणे आणि त्या निमित्ताने प्रत्येक पिढीमधला बंध घट्ट करणे हेच ‘DSJ’ चे उद्दिष्ट आहे.

हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडवा सण असल्याने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या सर्व शाखांमध्ये गर्दी पाहायला मिळाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.