Chinchwad : बालगोपाळांसाठी टाळदिंडी आणि लेझीम प्रशिक्षण वर्गाचे चिंचवडगाव येथे आयोजन

एमपीसी न्यूज – पतंजली योग समिती, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान व संस्कृती संवर्धन व विकास महासंघ , गीता परिवार या  सर्व संघटनांनी वयोगट 8 ते 16 मधील बालगोपाळांसाठी टाळदिंडी आणि लेझीम प्रशिक्षण वर्गाचे   दि. 17 ते  30 एप्रिल  या दरम्यान चिंचवडगाव येथे आयोजन केले आहे.

आताच्या स्पर्धात्मक युगात एक रेसचा घोडा म्हणून आपली मुले-मुली तयार न होता ते चारित्र्य संपन्न ,संवेदनशील, सहयोगी, सात्विकता, पवित्रता,राष्ट्राची संपत्ती व समाजाची सेवा म्हणून तयार झाले पाहिजेत याकरिता चिंचवड येथे विविध संस्कारा अंतर्गत टाळदिंडी आणि लेझीम प्रशिक्षण वर्ग वयोगट 8 ते 16 मधील बालगोपाळांसाठी आयोजित करण्यात येत आहे.  या प्रशिक्षण वर्गाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्या पाल्यांना भारतीय कुटुंब व्यवस्था आणि संस्कृतीचे महत्त्व समजले पाहिजे.

Pune: शिवकल्याण राजा’ कार्यक्रमातून पुणेकरांनी अनुभवले शिवकालीन युग

या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कै. मुरलीधर गावडे उद्यान, लक्ष्मीनगर,चिंचवडगाव येथे  ह.भ.प.मोरेदादा,सौ. अश्विनीताई मोरे तसेच जगन्नाथ पांढरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वयोगट 8 ते 16 मधील बालगोपाळांसाठी दि. 17 ते  30 एप्रिलपर्यंत (CHinchwad) केले आहे.

या प्रशिक्षण वर्गात भाग घेण्यासाठी पतंजली आरोग्य केंद्र, दर्शन हॉल शेजारी, चिंचवडगाव येथे पालकांनी आपल्या बालगोपाळांच्या प्रवेशासाठी संपर्क साधावा असे आवाहन पतंजली योग समिती, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान व संस्कृती संवर्धन व विकास महासंघ , गीता परिवार (Chinchwad) यांनी केला आहे. या  प्रशिक्षण वर्गात भाग घेण्यासाठी नोंदणी शुल्क 100 रुपये आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.