Chikhali : जेसीबी चालकाला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज-   जेसीबी चालक जेसीबीने एका प्लॉट मध्ये लेवल करण्याचे काम करत होता. त्यावेळी तिथे आलेल्या चौघांनी जेसीबी चालकाला मारहाण (chikhali) करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी जाधववाडी, चिखली येथे घडली.

विठ्ठल चव्हाण, गोकुळ चव्हाण, आतिश चव्हाण आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमर अशोक चांगभले (वय 38, रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune : पत्नीशी असलेल्या वादावर धार्मिक तोडगा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 5 कोटींची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जेसीबीने राहुल जाधव यांच्या जाधववाडी (chikhali) येथील प्लॉटवर लेवल करण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी ‘ही आमची जागा आहे तू  कसा काय लेवल करतो’ असे म्हणून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.