Pimpri : ताई, वहिनी, काकू, मावशी, आजी मतदान करायचे हा!!!

एमपीसी न्यूज – आजच्या युगातील आम्ही लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या महिला (Pimpri)आहोत,आम्ही शहराच्या जडणघडणीत नेहमी सहभागी होऊन आमचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतो. सक्षम लोकशाही देश बनविण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन “ताई” “वहिनी” “काकू” “मावशी” “आजी” यांना या निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करून महिला मतदानांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत हेच आमचे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन असेल असे मत शाहूनगर येथील बौद्ध विहाराच्या महिला भगिनींनी व्यक्त केले.

भारतीय बौद्धजन विकास समिती अंतर्गत पिंपरी चिंचवड मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी (Pimpri)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महिलांच्या भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात येते. यावेळी सहभागी महिलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. जवळपास 435 महिला निळे फेटे परिधान करून दुचाकी रॅलीत सहभागी झाल्या होत्या.लोकशाहीचा  उत्सव या उपक्रमात येथे आलेल्या महिलांनी धर्म,जात, समुदाय, भाषा व इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली त्यावेळी महिलांनी मतदान जनजागृतीचा निर्धार व्यक्त केला.

मतदान शपथ कार्यक्रमास अ प्रभाग क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे, निवडणूक विभागाचै सेक्टर ऑफिसर विजय कांबळे,प्रताप मोरे,नोडल अधिकारी मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक तसेच पिंपरी विधासभा कार्सायालयाचे महालिंग मुळे,दिनेश जगताप आणि सामाजिक क्षेत्रातील मनिषा कसबे, प्रज्ञा बोधडे, आशाताई बेसाने,अनिता इंगळे या उपस्थित होत्या.

 

Pune: शिवकल्याण राजा’ कार्यक्रमातून पुणेकरांनी अनुभवले शिवकालीन युग

यावेळी रॅलीसोबत असलेल्या  रथामध्ये भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह लोकशाही मध्ये मतदानाचे महत्त्व आणि मतदान जागृती बाबतचे फलक लावण्यात आले होते.

सदरची रॅली शाहूनगर येथील धम्मचक्र बुद्ध विहार येथून सुरुवात होऊन शाहूनगर परिसर, घरकुल, कृष्णा चौक, फुलेनगर, संभाजीनगर, मार्गे विद्यानगर, रामनगर, मोरवाडी मैत्री बुद्ध विहार, अहिल्याबाई होळकर पुतळा, भीमसृष्टी पिंपरी या मार्गावरून परत शाहूनगर अशी आयोजित केली होती. महिला दुचाकी रॅलीचे नियोजन समितीचे प्रमोद गायकवाड, वीणा कांबळे, प्रतिमा साळवी, करुणा बेडेकर, कांचन दोडके, यांनी महिला केले तर सूत्रसंचालन रमेश जाधव यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.