Pune: खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने तुळशीबाग, शनिपार परिसरात वीज खंडित

एमपीसी न्यूज – महावितरणच्या मंडई 22/11 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा (Pune)करणारी भूमिगत वीजवाहिनी पुणे महानगरपालिकेच्या पाईपलाइनच्या खोदकामात 15 दिवसांपूर्वी तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा रविवारी (दि. 7) रात्री 9 वाजता बिघाड झाला. त्यामुळे मंडई परिसरातील तुळशीबाग, शनिपार, विश्रामबाग वाडा आदी परिसरात खंडित झालेला 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (दि. 8) सकाळच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला.

दरम्यान मंडई उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या पर्यायी वीजवाहिनीच्या (Pune)दुरुस्तीसाठी 5 मीटर खोदाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी दि. 1 एप्रिलला महावितरणकडून लेखी परवानगी मागण्यात आली. मात्र पालिकेकडून ती मिळाली नसल्याने पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा उपलब्ध करून देता आला नाही.

याबाबत माहिती अशी, पर्वती विभाग अंतर्गत मंडई 22/11 केव्ही उपकेंद्रातील मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रोड आदी परिसरातील सुमारे 17 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्राला रास्तापेठ व नवी पेठ या दोन स्वतंत्र 22 केव्ही भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठ्याची सोय आहे. दरम्यान 15 दिवसांपूर्वी यातील रास्ता पेठ वीजवाहिनी पुणे महानगरपालिकेच्या पाइपलाइनच्या खोदकामात तोडण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने या वाहिनीच्या दुरुस्तीचे व जाईंटिंगचे काम केले होते. त्याच दरम्यान नवी पेठ वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मंडई उपकेंद्राच्या वीजपुरवठ्याची पर्यायी स्त्रोत बंद झाला. या वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे 5 मीटर रस्ताखोदाईची परवानगी मागण्यात आली. परंतु ती मिळाली नाही.

 

Pimpri-chinchwad : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी-चिंचवड व भोसरी शाखेच्या पहिली महिला अध्यक्षपदी डॉ. माया भालेराव

दरम्यान रविवारी (दि. 7) रात्री 9 वाजता रास्ता पेठ वीजवाहिनी 15 दिवसांपूर्वी लावलेला जाईंट खराब झाल्याने वीजवाहिनी नादुरुस्त झाली. खोदाई परवानगी न मिळाल्याने नवीपेठ वीजवाहिनीचा पर्यायी उपलब्ध नव्हता. त्यामुळे मंडई उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने सुमारे 17 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर महावितरणकडून मंडई उपकेंद्राच्या 6 पैकी 5 वी वाहिन्यांना तासाभरात अथक प्रयत्नांनी पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. मात्र उन्हाळ्यामुळे वीजभार वाढल्यामुळे महालक्ष्मी या वीज वाहिनीवरील तुळशीबाग, शनिपार, विश्रामबाग वाडा, नागनाथ पार येथील 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. तो सकाळच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. महावितरणकडून रास्तापेठ भूमिगत वीजवाहिनीचे रविवारी रात्री 11.30 वाजता दुरुस्ती काम सुरु करण्यात आले. सकाळी 11 वाजता ते पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेऊन या वीजवाहिनी द्वारे मंडई उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.