Chinchwad Traffic Diversion : रमजान ईद निमित्त चिंचवड मधील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – रमजान ईद या मुस्लिमांच्या पवित्र  सणानिमित्त चापेकर चौक येथील ईदगाह मैदान येथे नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात  नागरिक येत असतात. त्यामुळे गुरूवारी  (दि. 11) पहाटे पाच ते दुपारी बारा या कालावधीत ईदगाह मैदानाकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने  (Chinchwad Traffic Diversion) वळविण्यात आली आहे. याबाबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी आदेश दिले आहेत.

 

वाहतूक वळवलेले मार्ग –
मरीआई माता मंदिर ते चापेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक एस के एफ कंपनीकडून डाव्या बाजूला वळून अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
चापेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक चापेकर चौक जुना जकात नाका कडून उजव्या बाजूला वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल मार्गे इच्छित स्थळी जाईल अथवा चापेकर चौकातून उजव्या बाजूला वळून अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
बिजलीनगर, हनुमान मंदिर वेताळ नगर ते चापेकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – या मार्गावरील वाहतूक हनुमान मंदिर येथून डावीकडे वळून मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पीटल कडून इच्छित स्थळी जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.