Pune: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ घटक पक्षांच्या वतीने आंदोलन

एमपीसी न्यूज – आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Pune)यांना केंद्रसरकारच्या इडी या संस्थेने दिनांक 21 मार्च 2024रोजी अटक केली.  त्यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी वारजे येथील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांच्यावतीने वारजे येथील उड्डाणपुलाजवळ निर्दशन करुन आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात आम आदमी पार्टी, पुणे शहर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उबाठा) समाजवादी (Pune)पार्टी, वंचित बहूजन आघाडी, काँग्रेस इत्यादी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी समाजवादी पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अशोकराव गायकवाड, इब्राहिम यवतमाळवाले, समाजवादी पार्टी खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष वसंतराव कोळी, उपस्थित होते.

Talagaon: मुळ नंबरप्लेटवर डुप्लीकेट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पो चालाकावर गुन्हा

समाजवादी पार्टी, पुणे शहर व जिल्हा सरचिटणीस दत्ता पाकिरे यांनी समाजवादी पार्टीच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) काका चव्हाण, आदमी पार्टीचे शहर उपाध्यक्ष निलेश वांजळे, आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष अभिजित मोरे , शिवसेनेचे (उबाठा)  संतोष गोपाळ, वंचित बहुजन आघाडीचे अजय पोळ काही सामान्य नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर आंदोलनात वारजे येथील माजी नगरसेवक सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार), माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

https://www.youtube.com/watch?v=YN470gAkDJA&t=39s&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.