Talagaon: मुळ नंबरप्लेटवर डुप्लीकेट नंबरप्लेट लावणाऱ्या टेम्पो चालाकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – गाडीचा पासिंग लपविण्यासाठी  एकाने टेम्पोच्या नंबरप्लेटवर(Talagaon) दुसरी नंबर प्लेट लावली . याप्रकरणी  तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, हा प्रकार गुरुवारी (दि.21) उघडकीस आला.
याप्रकरणी प्रल्हाद रामबहाल पांडे (वय 47 रा.चिखली) यांनी तळेगाव एमआयडसी पोलीस (Talagaon)ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अशोक वसंतराव थोरात (वय 33 रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या मालकीच्या टेम्पोची नंबरप्लेट एमएच 25 यु 0458 अशी असताना फिर्यादीच्या मालकीचा एमएच 14 एचजी 4271 हा क्रमांक लावून बिनधास्त पिरत होता. ज्या वेळी ही बाब फिर्यादीच्या निदर्शनास आली त्यांनी  तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.