Pune: पर्वती विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांना विजयी करण्याचा निर्धार 

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने(Pune) बूथ संमेलनाची महाबैठक पार पडली. यावेळी उपस्थित राहून बूथ प्रमुखांशी संवाद साधत आमदार माधुरी मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.
तसेच पुणे लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना यावेळी जास्तीत-जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा विजयी निर्धार केला.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, पर्वती विधानसभा निवडणूक प्रमुख बाबाशेठ मिसाळ,(Pune) प्रदेश उपाध्यक्ष  राजेश पांडे, पुणे लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, शहर सरचिटणीस राजेंद्र शिळीमकर, रवींद्र साळेगावकर, जयंत भावे, प्रशांत दिवेकर, अजय भोकरे, प्रशांत थोपटे, राजू कदम,  विनया बहुलीकर, निखिल शिळीमकर,  जितेंद्र पोळेकर तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

दरम्यान, भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यापासून मुरलीधर मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यांच्या विजयासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी, आरपीआय (आठवले गट) तर्फे प्रयत्न केले जात आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.