Chimbli Fata: दुचाकी व हायवा ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – दुचाकीला हायवा ट्रक ने पाठीमागून धडक (Chimbli Fata)दिली . या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.21) चिंबळी फाटा येथे पुणे-नाशिक महामार्गावर घडला.
 
याप्रकरणी साईराज रोहिदास खताळ (वय 23 रा.मोशी) यांनी (Chimbli Fata)महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून हायवा ट्रक चालक लक्ष्मण किसन ढोकणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात भास्कर नामदेव खताळ हे जखमी झाले आहेत तर त्यांची पत्नी सुरेखा खताळ यांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Pune :  अवयवप्रत्यारोपणासाठी आवश्यक मदतीच्या जागृकतेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘बेबसी’ या लघुपटाचे प्रदर्शन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते भास्कर खताळ हे दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील हायवा ट्रक बेदरकारपणे चालवून खताळ यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत भास्कर यांच्या डोक्याला व हातापायाल गंभीर दुखापत झाली. तर सुरेखा यांच्या डोक्यावरून चाक गेले. त्यांना उपचारासाठी दावाखान्यात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.