Moshi: टेम्पो आडवा आणला म्हणून कार चालकाकडून टेम्पो चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज –  गाडी चालवत असताना टेम्पो चालकाने त्याचा(Moshi) टेम्पो आडवा आणला म्हणून  कार चालकाने टेम्पो चालकाला रॉडने मारहाण करत टेम्पोचे नुकसान केले आहे, ही घटना गुरुवारी (दि.21) मोशी येथील बनकरवस्ती येथे घडली आहे.
याप्रकरणी प्रशांत नारायण सुर्यवंशी (वय 35 रा.मोशी) यांनी भोसरी  (Moshi)एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ह्युंदाई आय 20 (एमएच 03 ए आर 4410)  चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी डे टेम्पो घेवून जात असताना आरोपीने त्याची कार आडवी लावून फिर्यादीला अडवले व माझ्या गाडी समोर टेम्पो का णतो म्हणत शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडने टेम्पोचे नुसान केले. यावेळी फिर्यादी अडविण्यात गेले असता आरोपीने रॉने फिर्यादीले देखील मारहाण केली.यावरून भेसरी एमआयडीसी पोलिसांनी  गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.