LokSabha Elections 2024 : मावळची उमेदवारी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना द्या, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन

एमपीसी न्यूज – महायुतीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा(LokSabha Elections 2024) कोणत्या पक्षाला सुटणार याची चर्चा असताना आता पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. त्यामुळे मावळच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येते.

मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला(LokSabha Elections 2024)आहे.  पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण हे सहा मतदारसंघ येतात.

 

राज्यातील राजकीय समीकरणे बदल्याने महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळवर दावा केला आहे. तिन्हीवेळेस युतीमध्ये भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. यावेळी भाजपला संधी मिळावी. उमेदवार कमळाच्या चिन्हावर असावा अशी भाजपची मागणी आहे.

 

Nigdi : मॉडर्न हायस्कूलमध्ये जागतिक जलदिन उत्साहात साजरा

 

महायुतीत मावळची जागा भाजपलाच मिळावी.  शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी. शहराध्यक्ष म्हणून जगताप करत असलेले कार्य याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल. शिवाय महायुती तसेच भाजपाला विशेष फायदा होईल.

 

अशा मागणीचे निवेदन भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. 2014 च्या निवडणुकीत शंकर जगताप यांचे बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून निवडणूक लढविली होती. याचाही फायदा पक्षाला तसेच महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी काळभोर यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.