Nigdi : मॉडर्न हायस्कूलमध्ये जागतिक जलदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – यमुनानगर निगडी येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल मध्ये (Nigdi)जागतिक जलदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांनी जागतिक जलदिनाची माहिती दिली.

पाणी सर्व सजीवांसाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य(Nigdi) पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने पाणी जपून वापरावे असे सांगताना पाण्याबरोबर मृदेचे प्रदूषण रोखणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

Shirur : शिवाजीराव आढाळराव पाटील यांचा मुहूर्त ठरला; अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबर आपल्या पालकांमध्ये जागृती करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवाजी अंबिके यांनी जागतिक जलदिनाची पार्श्वभूमी सांगताना पाणी शिळे होत नसल्याचे सांगून पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

यावेळी मीना अधिकारी यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना पाणी जपून वापरण्याबाबतची जल प्रतिज्ञा दिली.कार्यक्रमाचे आभार जया फुलपगार यांनी मानले.या उपक्रमाचे कौतुक मुख्याध्यापिका शारदा साबळे,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाहक प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.