Shirur : शिवाजीराव आढाळराव पाटील यांचा मुहूर्त ठरला; अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवाजीराव आढाळराव पाटील (Shirur) अनेक कार्यकर्त्यांसह 26 मार्च रोजी शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी घोषणा केली. लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे असेही यावेळी त्यांनी जाहीर केले. 

शिरूरच्या जागेसाठी नेहमीच शिवाजीराव आढाळराव पाटील हे आग्रही राहिले आहेत. खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्यात शिरूर जागेवरून नेहमीच वाद होताना दिसतात. त्यामुळे अमोल कोल्हे यांना शिरूर जागेसाठी तोडीस तोड व्यक्ती म्हणून शिवाजीराव आढाळराव पाटील यांचे नाव पुढे येते. परंतु, शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून पाटील यांना नेहमी नाराजी पत्करावी लागली.

Pimpri : अर्बन स्ट्रीटचा पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना फायदा

त्यामुळे यंदा पाटील शिरूर भागात कसे उभे राहणार हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार वाद पाहायला मिळाला (Shirur) होता. त्यामुळे बारामती प्रमाणे शिरूर जागा ही देखील अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यातच आता शिवाजीराव आढाळराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे जाण्याचा मुहूर्त ठरला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिवाजीराव आढाळराव पाटील असा सामना पुन्हा रंगणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.