LokSabha Elections 2024 :  ‘वंचित’च्या उमेदवारांमुळे मावळ, शिरूरमध्ये तिरंगी लढत

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडीने मावळ लोकसभा मतदारसंघातून माधवी जोशी ( LokSabha Elections 2024) यांना तर शिरूरमधून आफताब अन्वर मकबूल शेख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचितच्या उमेदवारांचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत येथील माधवी जोशी या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे जोशी यांनी शनिवारी वंचितमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली. महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे.

Khed Shivapur : खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली होती.  उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे आणि बारामतीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.

आता आफताब अन्वर मकबूल शेख यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि वंचितच्या शेख यांच्यात तिरंगी लढत ( LokSabha Elections 2024) होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.