Khed Shivapur : खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज – पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने ( Khed Shivapur)   भरलेला टँकर उलटला . त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या टँकरमधील अल्कोहोल रस्त्यावरती सांडलेले आहे.

Today’s Horoscope 23 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

हा टँकर उलटल्याने साताऱ्याहून पुण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावर 10 ते 12 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. टँकरला रस्त्यावरून बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू ( Khed Shivapur) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.