Today’s Horoscope 23 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 23 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 23.04.2024

शुभाशुभ विचार – 16 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – हनुमान जयंती.

राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – हस्त 20.00 चित्रा 22.32 पर्यंत नंतर स्वाती.

चंद्र राशी – कन्या 09.19 पर्यंत नंतर तुळ.

—————————–

मेष  ( शुभ रंग- मोरपंखी)

भागीदारीच्या व्यवसायात देण्या घेण्याचे व्यवहार चोख  ठेवा. वैवाहिक जीवनात काही जुन्या आठवणी मनाला आनंद देतील. दूरच्या प्रवासात काही वेळ खोळंबा संभवतो.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)

ध्येयप्राप्तीसाठी तुमचे अथक परिश्रम चालू असून तब्येतीकडे तुमचे दुर्लक्ष होत आहे. आज तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत हमखास यश मिळेल.

मिथुन (शुभ रंग – तांबडा)

उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. विद्यार्थी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आज सहकुटुंब एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्याल. छान दिवस.

कर्क ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी) 

आज तुमच्यासाठी गृह सौख्याचा दिवस, कुठेही न जाता घरी आराम करावासा वाटेल. गृहिणी आज घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. मुलांच्या शिस्तीला आज प्राधान्य द्यायला हवे.

सिंह ( शुभ रंग- मोतिया)

स्थावर विषयक मोठे आर्थिक व्यवहार टाळा. आज प्रवासात काही नवीन नाती जुळतील. आज काही अति हुशार मंडळीही तुमच्या संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज आहे.

कन्या (शुभ रंग- भगवा)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे कराल  आज नेत्यांची वक्तव्य जनमानसांवर प्रभाव टाकतील. आज आशादायी दिवस आहे.

तूळ (शुभ रंग- जांभळा)

आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. इतरांची टिंगल टवाळी करण्याचा आनंद घ्याल. महत्त्वाच्या चर्चेत आज आपलेच घोडे पुढे दमटवाल.

वृश्चिक ( शुभ रंग- गुलाबी) 

बेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गाला कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. दुकानदारांनी आज उधारी उसनवारी टाळावी.

धनु (शुभ रंग- केशरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून काही दुरावलेली नाती जवळ येतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळेल. तुमची अपूरी स्वप्ने साकार होतील.

मकर (शुभ रंग- पांढरा)

आज आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्त्वाच्या असतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. मित्रमंडळींना आज दोन हात लांबच ठेवलेले बरे.

कुंभ ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम मोडून चालणार नाही. वरिष्ठ आपल्यावर खुशच आहेत अशा भ्रमात राहू नका. मनशांतीसाठी सत्संग शिवाय दुसरा पर्याय नाही.

मीन  ( शुभ रंग- आकाशी)

आज आपल्या मर्यादित राहिलेले बरे. धाडसाची कामे आज टाळली तर बरे होईल. सासुरवाडी कडून एखाद्या लाभ संभवतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.