Pimpri : अर्बन स्ट्रीटचा पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना फायदा

एमपीसी न्यूज – शहरातील मुख्य रस्त्यांचा  (Pimpri) विकास अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना तसेच वाहनचालकांना विविध सुविधा उपलब्ध होत असून वर्दळ कमी होण्यासही मदत होत आहे. नागरिकांच्या हितासाठी प्रशासन काम करत असते त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून पदपथांवर किंवा रस्त्यावर वर्दळ होईल अशा प्रकारे अतिक्रमण करू नये. तसेच एक सुजाण नागरिक म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवणे, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या एमडीआर-31 रस्त्याचे फूटपाथ अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले, बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक हा रस्ता हिंजवडी आय.टी. पार्क कडून डांगे चौक मार्गे चिंचवड एमआयडीसी, भोसरी, चिखलीकडे जाणाऱ्या विकास आराखड्यातील 34.5 मीटर रुंदीचा मुख्य रस्ता आहे.

Maval : विजेचा धक्का लागून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना महावितरणकडून चार लाखांची नुकसानभरपाई

तसेच हा रस्ता औंध-रावेत या 45 मीटर रुंदीच्या बीआरटीएस (Pimpri) रस्त्याला जोडणारा फिडर रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते आणि या रस्त्याचा अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकास करणे गरजेचे आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार असून रस्त्यावर बसण्यासाठी दगडी आसने, जिम साहित्य तसेच म्युरल, पॅराबोला इ. सुविधा महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.