Aero India 2023 News : एअरो इंडिया 2023 ला सुरूवात,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज- बंगळुरूच्या येलाहंका येथे आजपासून (Aero India 2023 News) एअरो इंडिया 2023 या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोला सुरूवात झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एअर शोचं उद्घाटन पार पडलं.

भारताची हवाई युद्ध क्षमता सिद्ध करणारी वेगवेगळी विमाने, हेलिकॉप्टर यांनी आपली कौशल्ये सादर करत वेगवान भारताच्या विकासाची प्रचिती उपस्थितांना करून दिली.

7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगारवाढ

स्वदेशी बनावटीच्या तेजस, लाईट युटीलिटी हेलिकॉप्टर, हलके लढाऊ विमान तसेच सुखोई, मिराज सारख्या विविध विमानांनी वेगवेगळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली . त्यात आकर्षणाचे केंद्र ठरले ते तेजस हे लढाऊ विमान.

भारत आज लढाऊ विमानांमध्ये वेगाने प्रगती (Aero India 2023 News) करतो आहे. भारताने गेल्या आठ ते नऊ वर्षांत संरक्षण क्षेत्राला नवसंजीवनी दिली आहे. ही फक्त सुरुवात आहे. 2024-25 पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात 5 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे आमचं ध्येय आहे. हा केवळ एअर शो नसून त्यातून भारताचे सामर्थ्य दिसून येते,अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनवर पार पडेल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.