7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगारवाढ

एमपीसी न्यूज :  तुम्ही जर राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. (7th Pay Commission) केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ मिळणार आहे.

केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दुर करण्यात आल्या असून आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे.

राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारच्या सेवेतील 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नव्या या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन मिळणार आहे. दरम्यान महासंघाने परिपत्रक काढून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

Pune News : विद्यापीठातील ‘सायन्स पार्क’ तर्फे विज्ञान दिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

राज्य सरकारने वेतन श्रेणीतील तफावतीसंदर्भात एक समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशी वित्त आयोगाने स्विकारल्या आहे. त्यामुळे आता 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान केंद्र सरकारने 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यानंतर राज्यात देखील हा आयोग लागू करण्यात येणार होता. मात्र त्यात काही त्रुटी होत्या. (7th Pay Commission) आता नव्या शासन निर्णयात या सर्व त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.