Akurdi : कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारतीय विद्यार्थ्यांना अनेक संधी – डॉ. दीपक शिकारपूर

एमपीसी न्यूज – येत्या काळात भारतीय विद्यार्थ्यांना (Akurdi) कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचा चांगला अभ्यास केला पाहिजे. त्याचे फळ त्यांना भविष्यात मिळेल. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि फिडेल सॉफ्टटेक लि. जपान यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करारामुळे पीसीईटीच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे उत्कृष्ट शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन डिजिटल साक्षरता प्रसारक, लेखक करिअर मार्गदर्शक डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि फिडेल सॉफ्टटेक लि. जपान यांच्यामध्ये बुधवारी (दि.21) शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी फिडेल सॉफ्टटेक लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. एन. बी. चोपडे, पीसीसीओईच्या सहाय्यक अधिष्ठाता आंतरराष्ट्रीय संबंध, डॉ. रोशनी राऊत आदी उपस्थित होते.

सुनील कुलकर्णी म्हणाले, फिडेल सॉफ्टटेक लि. ही एक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असून प्रामुख्याने जपान मध्ये गेली पंधरा वर्षे कार्यरत आहे. कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यातील विकासाचा आणि बदलांचा विचार करून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे.

यामध्ये प्रामुख्याने कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स यांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न, जगणे अधिक सुसह्य करण्यासाठी प्रयत्न केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक सामंजस्य करारामुळे पीसीईटीच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची उत्कृष्ट संधी मिळणार आहे.

डॉ. गिरीश देसाई प्रास्ताविकात म्हणाले, फिडेल सॉफ्टटेक कंपनी बरोबर (Akurdi) केलेल्या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे पीसीईटी आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) विद्यार्थ्यांसाठी समर स्कूल आणि इंटर्नशिप कार्यक्रम, या दोन संस्थांमधील प्राध्यापक, विद्वान आणि कर्मचाऱ्यांसाठी अभ्यास दौरे, पीसीईटीची विद्यालये, पीसीईटी संस्था यांच्यातील परस्पर हितसंबंध असलेल्या क्षेत्रात संशोधन सहयोग, विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प संधी, फिडेल कर्मचार्‍यांसाठी एमटेक आणि एमबीएच्या संधी, शैक्षणिक- विद्याशाखा, विद्यार्थी यांची देवाणघेवाण, संशोधन सहयोग, संयुक्त प्रकाशन, नाविन्यपूर्ण पद्धती, इव्हेंट्सची संयुक्त संस्था – एफडीपी, एसटीटीपी, परिषद, सेमिनार, परिसंवाद, अभ्यासक्रमाचा विकास, जपानला अभ्यास दौरे, जपानमधील प्रतिनिधींच्या भेटी आदी बाबींचा समावेश आहे, असे देसाई यांनी सांगितले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी स्वागत केले. डॉ. रोशनी राऊत यांनी आभार मानले.

Pune : ‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शितेत वाढ – उपमुख्यमंत्री

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.