Alandi : लक्ष्मण महाराज पाटील यांनी मागितली ग्रामस्थांची माफी

एमपीसी न्यूज –  दि.5 ऑगस्ट रोजी आळंदीमध्ये एका व्हाट्स ग्रुपवरती (Alandi ) लक्ष्मण महाराज पाटील यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यांनी त्या किर्तनामध्ये आळंदीबाबत आक्षेपार्ह (गैरप्रकारे) विधान केले होते .

Pimpri : इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

त्यानंतर  व्हिडिओमधील वक्तव्याचा आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला होता. वारकरी (Alandi ) संप्रदायमध्ये ही भाषा शोभते का असा सवाल करत आळंदी ग्रामस्थांच्या वतीने रविवारी आळंदी पोलीस (Alandi) स्टेशनमध्ये लक्ष्मण पाटील यांच्या  विरोधात समस्त ग्रामस्थ आळंदीकरांनी तक्रार केली होती. लक्ष्मण महाराज पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली  होती.

आज दि.9 रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे लक्ष्मण  महाराज पाटील हे हजर होत त्यांनी त्यांच्या आक्षेपार्ह  वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत समस्त ग्रामस्थ आळंदीकरांची  माफी मागितली. यावेळी आळंदी पोलीस स्टेशन आधिकारी व समस्त ग्रामस्थ आळंदीकर (Alandi ) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.