Pimpri : पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेतील आर्थिक अफरातफर प्रकरणात अमर मुलचंदानी यांना ईडीने केली अटक

एमपीसी न्यूज : पुण्यातील पिंपरी (Pimpri) येथील सेवा विकास सहकारी बँकेतील आर्थिक अफरातफर प्रकरणात अमर मुलचंदानी यांना ईडीने अटक केली आहे. विकास सहकारी बँकेत तब्बल 429.6 कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार झाल्याचा आरोप टयांच्यावर करण्यात आला होता.

Chinchwad : कोयत्यासह तडीपार आरोपीला चिंचवड येथून अटक

 

ईडीमार्फत संपूर्ण बैंक घोटाळ्याची कसून चौकशी सुरू केली आहे. मुलचंदानीने बँकेतील सार्वजनिक ठेवींना वैयक्तिक जामीन ग्राह्य धरले आणि बँकिंग नियमांचे उल्लंघन करीत ठराविक कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केले होते. ७ जुलै पर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. मुलचंदानी यांची मालमत्ता याआधीच ईडीने जप्त केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.