Chinchwad : कोयत्यासह तडीपार आरोपीला चिंचवड येथून अटक

एमपीसी न्यूज : दोन वर्षासाठी तडीपार केले असतानाही (Chinchwad) आदेशाचा भंग करत कोयत्यासह परिसरात वावरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मंगळवारी (दि.4) रात्री अटक केली आहे.

रोहीत चंद्रकांत मुद्दे (वय 24, रा.निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी युनिट दोनचे पोलीस कॉन्स्टेबल संदेश देशमुख यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi : विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या रोड रोमियोला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला 10 जुलै 2020 रोजी तडीपार केले होते. त्याला पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून तडिपार केले होते. तरी देखील आरोपी कोयता घेऊन चिंचवड येथील अजंठानगर येथे फिरत होता.

पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडून कोयता (Chinchwad) जप्त केला तसेच निगडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.