Nigdi : विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या रोड रोमियोला अटक

एमपीसी न्यूज –  विवाहितेचा विनयभंग (Nigdi) करणे तसेच भररस्त्यात तिला मारहाण करणे व कुटुंबीयांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्या प्रकरणी याचा तरुणाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार जानेवारी 2023 पासून सोमवार(दि.3) रोजी निगडी प्राधिकरण येथे घडला.

आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने मंगळवारी (दि.4) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी जुनेद शेख (वय 36, राहणार आकुर्डी) याला अटक केली आहे.

Vadgaon : चिमण्या बघायला गेलेल्या मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला (Nigdi) आरोपी हा तू मला का टाळत आहेस असे म्हणून रस्त्यात अडवून शिवीगाळ करत असे. तसेच त्याने एप्रिल महिन्यात तू पोलिसात तक्रार का दिली असे म्हणून महिलेला रस्त्यातच मारहाण केली होती. यानंतर त्याने महिलेच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत तिचा सतत पाठलाग केला.

व्हॉट्सॲपवरही मेसेज करून तो त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून महिलेने निगडी पोलीस ठाण्यात अखेर तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.