Pune : सफरचंद एवढे महाग असतात काय? असे म्हणत विक्रेत्याला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फळांची विक्री करणाऱ्या एका इसमाला तीन जणांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी या विक्रेत्याला सफरचंद विक्रीची किंमत विचारली. त्यानंतर फिर्यादीने शंभर रुपये किलो आहेत असे म्हणतात सफरचंद एवढे महाग असतात काय असे म्हणत त्यांना मारहाण केली. विमानतळ (Pune) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपले घर परिसरात 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

Pune : शितपेयातून गुंगीचे औषध देत महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार; पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

सुमित अंकुश कोडलकर, केशव शंकर कोळी आणि महेश नामदेव घुले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.. याप्रकरणी अल्ताफ अहमद शेख यांनी तक्रार दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे अहमदनगर रस्त्यावरील आपले घर परिसरात फिर्यादी हे फळांची विक्री करतात. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आरोपी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फिर्यादी यांना सफरचंदाचा रेट विचारला. यावर फिर्यादी यांनी सफरचंद 100 रुपये किलो आहेत असे म्हणाले असता सफरचंद एवढे महाग असतात काय, तू काय लोकांना लुटतो की काय असे म्हणून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.