Pune : पुणे विद्यापीठात गणपतीच्या वर्गणीसाठी एकाला बांबूने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गणपतीसाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी एकाला लाकडी बांबूने मारहाण केल्याचा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे (Pune) विद्यापीठ परिसरातील सेवक वसाहतीत घडला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वाल्मिकी (वय ३०), प्रतिक मल्हारी (वय २३, रा. दोघे. विद्यापीठ सेवक वसाहत), उमेश (वय २५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत कृष्णा किशोर तांबोळी (वय ३५, रा. विद्यापीठ सेवक वसाहत) यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला.

Pune : पोलीस शिपायाचा अधिकारी महिलेवर पोलीस चौकीतच हल्ला; पुण्यातील घटनेने एकच खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार तांबोळी आणि वाल्मिकी, मल्हारी हे वसाहतीत राहण्यास आहेत. वाल्मिकी आणि मल्हारी यांनी तक्रारदार यांच्याकडे गणपती मंडळासाठी वर्गणीची मागणी केली. यावेळी तक्रारदार यांनी वर्गणी देण्यासाठी नकार दिला. तसेच, मी मोठ्या मंडळाला वर्गणी दिली असल्याचे सांगितले. त्याचा राग आरोपींना आला. वाल्मिकी, मल्हारी आणि साथीदारांनी त्यांना बांबूने मारहाण केली. या मारहाणीत हाताच्या कोपराला गंभीर जखम झाली आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.