Chakan : बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी (Chakan)तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 9) सकाळी क्देश्मुखवस्ती, चाकण येथे करण्यात आली.

रमेश गुलाब माकर (वय 46, रा. रोहकल, ता. खेड), सुरेश राजाराम (Chakan)भोंडवे (वय 38, रा. आंबेठाण, चाकण), वाजीद कुरेशी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष फटांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे करणार हजारो उमेदवार-मराठा क्रांती मोर्चा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील पिकप मध्ये दोन बैल चारापाण्याची व्यवस्था न करता करकचून बांधून ठेवले. प्राण्यांची वाहतूक करण्याचा त्यांनी कोणताही परवाना घेतला नाही.

बेकायदेशीरपणे प्राण्यांची वाहतूक आणि त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था न केल्याने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.