Talegaon Dabhade : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तळेगाव शहर अध्यक्षपदी नंदकुमार कोतुळकर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Talegaon Dabhade)तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष पदी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नंदकुमार सोपानराव कोतुळकर यांची निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मंत्री मदन बाफना, (Talegaon Dabhade)जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या हस्ते कोतुळकर यांना लोणावळा येथील कार्यकर्ता मेळाव्यात नियुक्तिपत्र देण्यात आले. या पत्रावर तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांची स्वाक्षरी आहे.
शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोतुळकर यांचा सत्कार करण्यात आला. नंदकुमार कोतुळकर हे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात.पक्ष अधिक बळकट करण्यासाठी वेळ देणार असल्याचे नंदकुमार कोतुळकर यांनी निवडीनंतर सांगितले.
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी अजित पवार यांच्या गटात जाणे पसंत केले. दरम्यान, पक्षातील फुटीमुळे तसेच स्थानिक नेतृत्वामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते.

 

दरम्यान, शरद पवार यांनी नुकताच लोणावळा येथे कार्यकर्ते व पदाधिकारी मेळावा घेत आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने काम करण्यासाठी बळ दिले. तसेच या मेळाव्यात काही नियुक्त्या देखील करण्यात आल्या. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उर्जा संचारली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.