Wakad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad )एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 9) मध्यरात्री सव्वा बारा वाजता कस्पटे चौक, वाकड येथे करण्यात आली.

गणेश भुंगा कांबळे (वय 21, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी (Wakad )सहायक फौजदार राजेंद्र काळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे चौक वाकड येथे अर्धवट असलेल्या ब्रिजजवळ एक तरुण पिस्टल घेऊन आल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन गणेश कांबळे याला ताब्यात घेतले.

Nigdi : कब्रस्तान मधील कबरीवरील माती हटवण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

 

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजारांचे एक पिस्टल आणि 300 रुपये किमतीचे एक काडतूस आढळून आले. त्याच्याकडे पिस्टल बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याने हे शस्त्र बाळगल्या बाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.