Charholi: वहीवाटीचा रस्ता बंद करत दमदाटी केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वहीवाटीचा रस्ता तारेचा कंपाऊंड टाकून बंद करत (Charholi)दमदाटी केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा सारा प्रकार मंगळवारी (दि.16) चऱ्होली येथील जमिन गट क्रमांक 389 येथे घडली आहे.
याप्रकरणी अनंता मारूती गावडे (वय 60 रा. भोसरी)  यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Charholi)फिर्याद दिली असून रामदास पंडीत काळजे, पंडित  तुकाराम काळजे, ऋतिक रामदास काळजे (रा. चऱ्होली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : बनावट दस्त व घोषणापत्र सादर केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची चऱ्होली गट नंबर 389 येथे जमीन आहे, मात्र आरोपींनी जमिनीकडे येणाऱ्या 15 फुटी रस्त्यावर तारेचे कंपाऊड टाकून वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे. यावेळी फिर्यादी यांनी विचारणा केली असता यापुढे रस्त्याचा वापर करायचा नाही तुमच्या प्लॉटकडे तुम्ही कसे जाता ते बघतो, मोजणी ची होस आली आहे म्हणत फिर्यादी यांना दमदाटी करण्यात आली. यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.