Khalumbre: कंपनीच्या मेल चा गैरवापर करुन कंपनीची 5 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कंपनीच्या मेलचा वापर करून कंपनीच्या नावे(Khalumbre) माल खरेदी करून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कंपनी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही फसवणूक 10 जानेवारी 2024 ते 16 एप्रिल 2024 या कालावधीत एसीई इंजिनियरींग प्रा.लि. खालुंब्रे येथे घडली आहे.

याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कंपनीचे संचालक अनंत सतविदरसिंग कालरा(Khalumbre) (वय 40 )  यांनी फिर्याद दिली आहे, यावरून निलेश तुकाराम नेवसे (वय 42 रा.शिरुर) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Alandi: आळंदी मध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कंपनीचा लॅपटॉप वापरून कंपनीच्या मेलवरून मेंडरला मेल केला. वेंडरकडून आरोपीने माल खरेदी करून तो परस्पर विकला. अशाप्रकारे आरोपीने आतापर्यंत 5 लाख रुपयांची फसवणूक केली आहे, आरोपी हा  कंपनीचा लॅपटॉप घेवून फरार झाला आहे. यावरून एमआयडीसी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

 

https://www.youtube.com/shorts/crsZLJndqCM

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.