Bhosari : पावसामुळे सिमाभिंत कोसळली; दोघेजण जखमी

एमपीसी न्यूज – भोसरी येथील कुस्ती संकुलाच्या मागे असेलेली (Bhosari) सीमाभिंत सततच्या पावसामुळे कोसळली. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.

उमेश गौतम (वय 19) आणि परवेझ अली (वय 35, दोघेही रा. शांतीनगर, भोसरी) अशी जखमींची नावे आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास शांतीनगर, भोसरी येथील कुस्ती संकुलाच्य मागील बाजूस असलेली सीमाभिंत कोसळल्याची माहिती माजी नगरसवेक संतोष लोंढे आणि हरिश लोंढे यांनी दिली.

Pune : सामाजिक संपत्ती निर्मात्यांमुळे समाजात समन्वय निर्माण होईल – डॉ. अजित रानडे

या भिंतीखाली काहीजण अडकल्याचेही सांगण्यात आले. त्यानुसार (Bhosari) संत तुकाराम नगर, पिंपरी येथील अग्निशमन मुख्यालयातून दोन बंब, मोशी आणि भोसरी अग्निशमन उपकेंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच नागरिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या उमेश गौतम आणि परवेझ अली या दोघांना बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.