Khed : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव जाणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सह प्रवासी जखमी झाला. ही घटना रविवारी (दि.10) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास खेड (Khed) तालुक्यातील काळूस येथे घडली.

Pune : नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

धोंडीभाऊ श्रीपती पाचारणे (वय 54) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शिवाजी राघू पाचारणे (वय 68 , रा. तिन्हेवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे चुलत भाऊ धोंडिभाऊ हे दुचाकीवरून जात होते. ते काळूस गावच्या हद्दीत आले असता समोरून येणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी जखमी झाले. त्यांचे चुलत भाऊ धोंडिभाऊ हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती न देता अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.