Chinchwad : वृत्तपत्र विक्रेत्यांचा दिपावली कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ पुणे चिंचवड विभागाचा (Chinchwad)दिवाळी कौटुंबिक स्नेह मेळावा दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिशय उत्साही वातावरणात पार पडला. दरवर्षीप्रमाणे मेळाव्यात चिंचवड विभागातर्फे कौटुंबाला दिवाळी भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

यावेळी चिंचवड विभागातर्फे विक्रेत्या बंधूंसाठी दहा लाखाचा अपघात विमा (Chinchwad)विभागातर्फे करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व प्रेस व्यवस्थापन विक्रेते व बंधू भगिनी उपस्थित होते.

Maratha Reservation : बागेश्वर धामचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

चिंचवड विभागाचे मनोगत चिंचवड विभाग प्रमुख मनोज काकडे यांनी व्यक्त केले सूत्रसंचालन हेमंत तांबे सर यांनी केले पुणे वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांनी विक्रेत्यांना यावेळी मार्गदर्शन केले. तर विलास जंगम यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.