Wagholi : वाघोलीत 16 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – वाघोलीत अनुसया पार्क येथे 16 वर्षीय मुलाने राहत्या (Wagholi)घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.6) उघडकीस आली. मात्र आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

अजय विश्वनाथ पवळे (वय 16 , रा. अनुसया पार्क, वाघोली) असे (Wagholi)आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आई सायंकाळी कामावरून घरी आली असता हा सारा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

AAP : आम आदमी पार्टीच्या महिला आघाडीची रेशन कार्यालयावर धडक; प्रशासनाला विचारला जाब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय अकरावीत शिक्षण घेत होता. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना अजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. लोणीकंद पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.