Pune : पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट ? एनआयए च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

एमपीसी न्यूज – पुण्यात साखळी बॉम्ब स्फोट घडवून मोठा (Pune)घातपात करण्यासाठी योजना आखली जात होती ज्याला सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक एनआयए माहिती तपासात समोर आली आहे.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए)या तपासात(Pune) महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला अटक केली आहे.त्याच्याकडील तपासात ही माहीती समोर आल्याचे सांगितले जात आहे.

Chinchwad : वृत्तपत्र विक्रेत्यांचा दिपावली कौटुंबिक स्नेह मेळावा उत्साहात साजरा

कोथरूड परिसरात 19 जुलै 2023 रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. परंतु घरझडती घेण्यासाठी जात असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.

पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या इतर आरोपींशी शाहनवाझ आलमचा थेट संबंध होता. शाहनवाझने बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी विविध ठिकाणांचा शोधही घेतला होता, असेही तपासात उघड झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

पुणे पोलिसांचे ही कौतुक –

देशभरात दहशतवादी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना कोथरुड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले. दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यात आल्यानंतर पुणे, मुंबईसह देशभरातील महत्वाच्या शहरात घातपाती कारवाया करण्याचा डाव उधळला गेला. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक दिनकर गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि परिमंडळ तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा यांचे कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी पुणे पोलिसांना अभिनंदन पत्रही दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.