Pimpri : उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे हे माणुसकीचे लक्षण – राम राजमाने

एमपीसी न्यूज – स्वच्छता कर्मचाऱ्यांसारख्या उपेक्षित श्रमिकांची दखल घेणे (Pimpri)हे माणुसकीचे लक्षण आहे, असे मत पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सोमवारी (दि.6) सोहम् सार्वजनिक ग्रंथालय येथे बोलताना व्यक्त केले.

पिंपरी येथील सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दीपावलीनिमित्त (Pimpri) संत तुकारामनगर येथील ‘ह’ प्रभागातील कचरावेचक आणि स्वच्छतादूत महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सन्मान करताना राम राजमाने बोलत होते. माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा धर, सुजाता पालांडे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती मायला खत्री, संत तुकारामनगर व्यापारी संघटना अध्यक्ष किरण सुवर्णा, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पवार, भारतीय युवा काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक – अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, सचिव प्रदीप बोरसे आदी उपस्थित होते.

Pune : पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट ? एनआयए च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

राम राजमाने पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे येथील विद्यार्थी खूप नशीबवान आहेत. त्यांना पुस्तकांसह अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. अलीकडे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमधील यशाची टक्केवारी वाढली आहे, ही स्तुत्य बाब आहे.

याप्रसंगी ज्योत्स्ना जाधव, तुळसाबाई प्रधान, खाजाप्पा गायकवाड, रेखा साळवे, संगीता भिसे, पारू पवार यांना नवीन कपडे, सुकामेवा आणि मिठाई प्रदान देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर ग्रंथालयाचे सदस्य गौरव चौधरी यांची भारतीय युवक काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्टपदी तसेच ‘यंग इंडिया के बोल – सीजन 4’ साठी गोवा राज्याच्या प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

वर्षा बोरसे आणि ग्रंथालयातील कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरव चौधरी यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.