Chinchwad : एक वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या (Chinchwad)दोन गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयता आणि कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई श्रीधरनगर चिंचवड येथे करण्यात आली.

अशोक मरीबा तुपेरे (वय 24, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune : पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट ? एनआयए च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या(Chinchwad) माहितीनुसार, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळच्या वेळी पायी पेट्रोलिंग करण्याबाबत सर्व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. श्रीधरनगर परिसरात पायी पेट्रोलिंग करत असताना चिंचवड पोलिसांना एक तरुण संशयितपणे कारसह थांबलेला दिसला. त्याच्या कारच्या काचा काळ्या रंगाच्या होत्या. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला हटकले. पोलिसांनी हटकताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक कोयता आढळला. त्याच्याबाबत माहिती घेतली असता त्याच्यावर सन 2022 आणि सन 2023 मध्ये अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्री करणे याबाबतचे दोन गुन्हे दाखल असून तो त्या दोन्ही गुन्ह्यात फरार होता.

तसेच आरोपी अशोक तुपेरे याच्या विरोधात यापूर्वी वाकड पोलीस ठाण्यात सहा आणि चिंचवड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. आरोपीला अटक करून त्याच्याकडून 93 हजार रुपये रोख रक्कम आणि कार असा एकूण सहा लाख 93 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, पोलीस अंमलदार धर्मनाथ तोडकर, सागर आढारी, सचिन सोनपेठे, गोविंद डोके, उमेश मोहिते, रहीम शेख, अमोल माने, पंकज भदाणे, राजेंद्र माळी, सिद्धार्थ खैरे यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.