Wagholi : वाघोलीमध्ये देशी दारूच्या दुकानात 3 ते 4 जणांमध्ये  जोरदार हाणामारी

एमपीसी न्यूज – पुण्याच्या वाघोली मध्ये केसनंद रोडवर असणाऱ्या देशी दारूच्या (Wagholi) दुकानात 3 ते 4 जणांमध्ये  जोरदार हाणामारी झाली आहे. वाघोली पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली  .

Aalndi : आळंदी नगरपरिषदेकडून करवसुलीसाठी धडक कारवाई, 14 मालमत्ता सील, 48 नळ कनेक्शन कट

वाघोली पोलीस चौकी पासून जवळच्या अंतरावर असलेल्या मुख्य चौकात एक देशी दारूचे दुकान आहे. शनिवारी संध्याकाळी तिथे काही जण मद्यपान करण्यासाठी त्या ठिकाणी बसलेले होते. या मध्ये एक पीएमपीएलचा कर्मचारीसुद्धा होता.  अचानक  3 ते 4 जणांमध्ये जोरदार  हाणामारी सुरु झाली. या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले असून यामध्ये दोघेजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे कारण मात्र  अद्याप  कळू शकले नाही.

मेन चौकात हे दारूचे दुकान असल्याने महिलांना याचा खुप त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे लोणीकंद पोलीसांनी कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी (Wagholi) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.