Wagholi: सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची ओढणीने गळफास घेत आत्महत्या

एमपीसी न्यूज – सततचे टोमणे व इतर त्रासाला कंटाळून महिलेने (Wagholi)ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना वाघोली परिसरात घडली.

प्रीती संजय शिंदे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय (Wagholi)सखाहरी शिंदे, सासू इंदूमती शिंदे (दोघे रा. ऐश्वर्य लक्ष्मी सोसायटी, वाघोली, नगर रस्ता), नणंद प्रतिभा गणेश माळोदे (रा. आडगाव, नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रीतीचे वडील मोहन विष्णू मते (वय 47, रा. पार्थ रो हाऊस, आडगाव, जि. नाशिक) यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रीतीचा संजय शिंदे याच्याशी डिसेंबर 2021 मध्ये विवाह झाला होता.

Pune : गांधी भवन मध्ये रोजा इफ्तारचे आयोजन

संजय खासगी कंपनीत कामाला आहे. विवाहानंतर किरकोळ कारणांवरुन तिचा छळ सुरू करण्यात आला. तिला टोमणे मारण्यात आले. छळ असह्य झाल्याने तिने ओढणीने गळफास घेतल्याची घटना वाघोलीतील राहत्या घरात घडली. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.