Pune : गांधी भवन मध्ये रोजा इफ्तारचे आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल या (Pune)संघटनांच्या वतीने बुधवारी (दि.27) सायंकाळी सहा वाजता गांधीभवन, कोथरूड येथे ‘रोजा इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गांधी भवन मध्ये रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित (Pune)करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य, सर्वांना रोजगार आणि जातीनिर्मूलन हे गांधीजींनी सांगितलेले भारतीय राष्ट्रवादाचे तीन आधार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आणि एकमेकांच्या सण-उत्सवात आनंदाने सहभागी होणे, हे भारतीय धर्मनिरपेक्षतेचे सौंदर्य आहे. दिवाळी, रमजान ईद आणि नाताळ हे त्यासंदर्भातले तीन प्रमुख सण आहेत.

ज्यात प्रत्येक भारतीयाने सहभाग घेतला पाहीजे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधूता निर्माण करण्याचा संकल्प भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्या संकल्पाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या रोजा इफ्तार कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात रोजा म्हणजे दिवसभराचा उपवास सोडण्यासाठी मुस्लिम बंधू-भगिनी गांधी भवनमध्ये सायंकाळी सहा वाजता येतील. त्यांच्या सेवेसाठी सर्वधर्मीय कार्यकर्ते दुपारी चार वाजता गांधी भवन मध्ये एकत्र येवून पुर्वतयारी करतील. ज्यांना या सेवाकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी दुपारी चार वाजता गांधी भवनला यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Pune: होळी निमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास

‘निर्भय बनो आंदोलन’चे ॲड. असीम सरोदे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे लुकस केदारी, इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशनचे अध्यक्ष पैगंबर शेख, पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे अध्यक्ष फिरोज मुल्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव संदीप बर्वे, विश्वस्त अन्वर राजन हे देखील उपस्थित राहणार आहेत. युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर, संघटक अप्पा अनारसे, पुणे शहराध्यक्ष मुस्कान परवीन बाबासाहेब, सुदर्शन चखाले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.