Ujjain: उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग;13 जण जखमी

एमपीसी न्यूज : उज्जैनच्या महाकाल मंदिरात सोमवारी (Ujjain)भस्म आरती सुरू असताना गर्भगृहात आग लागली. या आगीत पुजाऱ्यासह 13 जण जखमी आहेत. घटनेत जखमी झालेल्या भाविकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता, याचदरम्यान ही घटना घडली आहे.

 

Metro News : आज मेट्रो सेवा दुपारी दोन नंतर होणार सुरू

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महाकाल मंदिरात सोमवारी (Ujjain)आरती सुरू असताना हा प्रकार घडला आहे. गर्भगृहाला आग लागली. या आगीत पुजाऱ्यासह  13जण होरपळले आहेत. अचानक आग लागल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.

आगीत जखमी झालेल्या भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.