Metro News : आज मेट्रो सेवा दुपारी दोन नंतर होणार सुरू

एमपीसी न्यूज – धुळवडी निमित्त सोमवारी (दि. 25) मेट्रोची सेवा(Metro News )दुपारी दोन वाजेपर्यंत बंद आहे. त्यानंतर मेट्रो सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे.

 

याबाबत महामेट्रो प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. सोमवारी मेट्रो सेवा दुपारी (Metro News )दोन नंतर सुरू होणार आहे. दुपारी दोन नंतर सुरू झालेली मेट्रो सेवा रात्री दहा वाजेपर्यंत नियमित वेळेत सुरू राहील.

LokSabha Elections 2024 : जाहीर सभांसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील 66 ठिकाणे निश्चित

 

दुपारपर्यंत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेळेची बचत होत असल्याने प्रवासी मेट्रोला पसंती देत आहेत. दरम्यान धुळवड निमित्त मेट्रो प्रशासनाने दुपारपर्यंत मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.